बायणा रवींद्र भवनात गायन स्पर्धा

0
67

वास्को (न. प्र.)
रवींद्र भवन, बायणा वास्कोतर्फे मुरगांव तालुका मर्यादित कोंकणी कांतारां काराओके एकल गायन स्पर्धेचे शनिवार दि. २७ ऑक्टोबर रोजी संध्या. ५.०० वा. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रुपये ५००० रोख, चषक व प्रशस्तिपत्र, दुसरे बक्षीस रु. ३५०० स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र, तिसरे बक्षीस रु. २५०० स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रुपये १५०० व प्रशस्तिपत्र देण्यात येईल. ही स्पर्धा १६ वर्षाखालील फक्त २५ स्पर्धकांसाठी प्रथम येणार्‍यास प्रथम या तत्वावर आहेत. प्रवेशिका रवींद्र भवन येथील कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असून प्रवेशिकांसाठी नाममात्र शुल्क रु. १०० फक्त आकारण्यात येईल. प्रवेशिका दि. २२ ऑक्टोबरपर्यंतच स्वीकारण्यात येतील असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (०८३२-२५००९६३) या क्रमांकावर संपर्क साधावा.