बायंगिणी कचरा प्रकल्पाच्या बोलीसाठी पुन्हा मुदतवाढ

0
20

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने बायंगिणी येथे कचरा प्रकल्प उभारण्यासाठी पाचव्यांदा मागवलेल्या बोलींना कुणीही प्रतिसाद न दिल्याने महामंडळाला या बोली सादर करण्यासाठी पाचव्यांदा मुदत वाढवावी लागली. पाचव्यांदा मागवलेल्या बोलींची मुदत काल २ डिसेंबर रोजी संपल्यानंतर गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने काल १६ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवली.

दर दिवशी १०० टन एवढ्या कचर्‍यावर प्रक्रिया करू शकणार्‍या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी महामंडळाने पाचव्यांदा बोली लावली होती. मात्र काल शेवटच्या दिवसापर्यंत कुणीही प्रतिसाद न दिल्याने काल महामंडळाने त्यासाठीची मुदत काल १६ डिसेंबरपर्यंत वाढवली.

याप्रकल्पाची रचना करणे, त्याचे इंजिनिअरिंग, तो बांधणे व चालवणे यासाठी महामंडळाने बोली लावलेली आहे. मात्र, या १२० कोटी रु.च्या प्रकल्पासाठी सतत पाच वेळा बोली लावूनही एकाही कंपनीकडून अद्याप प्रतिसाद मिळू शकलेला नाही.