बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले असून मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील पोलिसांच्या मदतीने काल (रविवार दि. 10) मुख्य संशयित शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम (20) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकुमार हा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांनी शिवकुमार याला आश्रय दिल्याप्रकरणी अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव, अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही अटक केली आहे. शिवकुमार याने पोलीस चौकशीच आपण लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून परदेशात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या भावाच्या सांगण्यावरून आपण बाबा सिद्दिकीला मारल्याचे त्याने कबूल केले आहे. दरम्यान, एनआयएसच्या तपासात लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेनुसार टार्गेट लॉक केल जाते आणि संधी मिळताच त्याला संपवले जाते. देशभरात या टोळीचे 700 शटर्स पसरले आहेत. यापैकी पंजाब, हरियाणा, राजस्थान परिसरात 300 तर उर्वरित 400 शूटर्स मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पसरल्याची माहिती समोर आली आहे