बाणावलीत रुग्णवाहिका उपलब्ध करा : व्हेंझी

0
11

बाणावली मतदारसंघात रुग्णवाहिकेची कमतरता भासत आहे. बाणावली मतदारसंघासाठी एक स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करावी. मतदारसंघातील आरोग्य केंद्रात साधन सुविधांचा अभाव दिसून येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवावा आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी केली.

डेंग्यू फैलावाचा अभ्यास करा : लोबो
कळंगुट परिसरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. डेंग्यूच्या फैलावाचा अभ्यास करण्याची गरज आहे. कळंगुट मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवावा. सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या केंद्राच्या कामाचा आढावा घेण्याची गरज आहे, असेही आमदार लोबो यांनी सांगितले.

गिरी परिसरात डेंग्यूचे रुग्ण : केदार
गिरी परिसरात डेंग्य़ू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाकडे डासांची पैदास रोखण्यासाठी किटकनाशकांची कमतरता आहे. साळगाव येथे एक खास रुग्णवाहिका उपलब्ध करावी. तसेच दंत चिकित्सेची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी आमदार केदार नाईक यांनी केली. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांना बांबोळी येथे पाठवावे लागत आहे, असेही आमदार नाईक यांनी सांगितले.