दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून जोसेफ पिमेंटा यांच्या नावाची घोषणा आम आदमी पक्षाचे राज्य प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी येथील मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली. यावेळी आपचे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे, जोसेफ पिमेंटा यांची उपस्थिती होती. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघात 23 जून रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.