बाणस्तारी अपघातात ३ जण गंभीर जखमी

0
206

बाणस्तारी येथे महामार्गावर काल संध्याकाळी बोलेरो व एस्टिम कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची ओळख पटू शकली नाही. त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. एस्टिम कारचा चक्काचूर झाला असून बोलेरो जीपच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर पणजी – बाणस्तारी महामार्गावरील वाहतूक कित्येक तास खोळंबली होती.