बांबोळी येथील ‘फुलां खुरीस’ जवळ एका रेंट ए कारला झालेल्या स्वयंअपघातात गाडीचा चालक गंभीररित्या जखमी झाला. तर गाडीतील अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाले. चारही जखमींना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात भरती करण्यात आले आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर गाडीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने चालकासह गाडीतील चारजण जखमी झाले. तसेच गाडीची मोडतोड झाली. दरम्यान, परवा रिक्षा अपघातात जखमी झालेला रिक्षाचालक अब्दुल ऊर्फ रशीद शेख याचे काल निधन झाले. नुवे येथे त्यांच्या रिक्षाला एका चारचाकी गाडीने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. राजाराम मयेकर हे चारचाकी गाडी चालवत होते.