बांबोळीत लवकरच रक्तसंक्रमण केंद्र : राणे

0
3

बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलच्या आवारात एक नवीन अत्याधुनिक इम्युनोहेमॅटोलॉजी आणि रक्तसंक्रमण केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल दिली. गोमेकॉ आणि हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सल्टन्सी कॉर्पोरेशन (एचएससीसी) लिमिटेड यांच्यात यासंबंधीचा एका सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही सुविधा गोमेकॉच्या सुपरस्पेशालिटी ब्लॉक आणि नियोजित कर्करोग केंद्राला मदत करेल, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, हे नवीन केंद्र रक्तसंक्रमण औषधात पदव्युत्तर अभ्यासक्रम देणार आहे. जे सध्या देशभरातील काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती विश्वजीत राणे यांनी दिली. दरम्यान, जागतिक आरोग्यसेवा आणि निदान कंपनी ॲबॉट गोव्यात विद्यमान प्रयोगशाळेच्या पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण करणार आहे. कंपनी गोव्यातील विविध आरोग्य केंद्रांमधील प्रयोगशाळांचा दर्जा वाढविण्याचे काम करणार आहे, अशी माहिती राणे यांनी ॲबॉट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर काल दिली.