बांगलादेश व पाकिस्तानातून भारतावर एकाचवेळी हल्ले करू

0
94

>>आयएसआयएसची धमकी

बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांतील दहशतवाद्यांच्या मदतीने भारतावर एकाचवेळी हल्ला चढवण्याची धमकी आयएसआयएसने दिली आहे. दोन्ही देशांतील दहशतवादी संघटनांची त्यासाठी मदत घेतली जाईल असे आयएसआयएसच्या ऑनलाइन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत सदर दहशतवादी संघटनेचा बांगलादेशचा ‘अमीर’ शेख अबू इब्राहिम अल हनीफ याने ही धमकी दिली आहे.
आयएसआयएससाठी बांगलादेश धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे असेही त्याने म्हटले आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या विलायत खुरासान या दहशतवादी संघटनेच्या मदतीने आयएसआयएस भारतावर स्थानिक मुजाहिदीनांच्या मदतीने केव्हाही हल्ले चढवू शकते असेही हनीफने मुलाखतीत म्हटले आहे.
इस्लामी दहशतवाद्यांच्या बांगलादेशातील वाढत्या वावराबाबत अमेरिकेने गेल्या महिन्यात चिंता व्यक्त केली होती. अनेक ब्लॉगरवर तेथे हल्ले चढवले गेले असून दहशतवादी कारवायांत वाढ झाली आहे. आयएसआयएसने त्या हल्ल्यांची जबाबदारीही स्वीकारली आहे. आयएसआयएसचे जिहादी रिरिया आणि इराकमधील आपल्या अमलाखालील प्रदेश गमावत चालले आहेत. त्यामुळे अशा वेळी आयएसआयएसचा नायनाट करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असेल असा इशाराही अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला होता.