बांगलादेशमध्ये आज अंतरिम सरकार येणार

0
10

शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. बांगलादेशमध्ये आज (दि. 8) अंतरिम सरकार स्थापन होणार असून, या सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे. बांगलादेशच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. अंतरिम सरकाराचा शपथविधी गुरुवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान पार पडणार असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी काल दिली. युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये 15 सदस्य असू शकतात.