बसस्थानके, बसगाड्या सॅनिटायझ करणार ः राणे

0
154

राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन राज्यातील सर्व बसस्थानके व सार्वजनिक बस गाड्या सॅनिटायझ करण्यात येणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. यासंबंधी आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. सॅनिटाईझेशन करण्याचे काम आऊटसोर्स करावे लागणार आहे. त्याबाबत आपण मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राणे पुढे म्हणाले.

राज्यातील लोक बसस्थानके व बसेस यांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी बसस्थानके व बसगाड्यांचे सॅनिटायझेशन करणे गरजेचे असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी जे जे काही करण्याची गरज आहे ते ते आरोग्य खाते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली करीत असल्याचे राणे म्हणाले.