बलुचिस्तानमधील हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू

0
2

पाकिस्तानच्या पश्चिम प्रांतातील बलुचिस्तानमधील तुर्बत शहरात एका बसमध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 25 जण जखमी झाले आहेत. यातील 5 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या हल्ल्यात एसएसपी दर्जाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीयही जखमी झाले आहेत. एसएसपी यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने बंडखोरांनी बसवर हल्ला केला असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर, बीएलएच्या प्रवक्त्याने एक व्हिडिओ जारी केला आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यापूर्वी गेल्या महिन्यातही येथे झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता. बीएलए हा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील सर्वात मोठा बलूच दहशतवादी गट आहे. ते अनेक दशकांपासून पाकिस्तान सरकारच्या विरोधात बंड करत आहे. हा गट बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची आणि चीनला त्याच्या भागातून हद्दपार करण्याची मागणी करत आहे. बीएलने पाकिस्तानी सुरक्षा दलांना आणि चीनच्या प्रकल्पाला लक्ष्य करून अनेक हल्ले केले आहेत.