बलात्कार प्रकरणी पोलिसाला अटक

0
11

येथील पणजी महिला पोलीस विभागाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका पोलीस शिपायाला अटक केली असून, त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. या बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव मंजुनाथ ऊर्फ उमर कोली असे आहे. त्याच्याविरोधात गोवा बाल कायदा आणि पॉस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.