बलात्कार प्रकरणे वाढत असून अशा प्रकरणात पौरुष्य चाचणी गरजेची असल्याचे काल सुप्रीम कोर्टाने सांगितले. नित्यानंद स्वामी हे २०१० सालच्या एका बलात्कार प्रकरणात पौरुष्य चाचणीसाठी तयार होत नसल्याप्रकरणी कोर्टाने काल वरील मत व्यक्त केले. चाचणी नकारात्मक आल्यास आरोपी मुक्त होऊ शकतो, असेही कोर्टाने सांगितले.