बरकटे मोले येथे अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू

0
5

>> प्रवासी बस, ट्रक व कार यांच्यात अपघात

बरकटे – मोले येथे प्रवाशी बस, मालवाहू ट्रक व कार यांच्यात झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर प्रवासी बसमधील अनेक जण जखमी झाले. जखमींना पिळये आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. कुळे पोलिसांनी अपघताचा पंचनामा केला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. या अपघातात बसचालक व एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहेत.

प्राप्त माहितीनुसार जीए 07 टी 0548 या क्रमांकाची प्रवासी बस पणजीहून कर्नाटकला जात होती. बरकटे – मोले येथे पोहचताच बसची धडक समोरून येणाऱ्या केए 63 ए 3760 या क्रमांकाच्या ट्रकला बसली. त्यानंतर बसची धडक ट्रकच्यामागे असलेल्या कारला बसली. अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले. यात बस चालक केबिनमध्ये अडकून पडला. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी जाऊन जखमींना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून पिळये आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातावेळी कारमध्ये एकूण 6 जण होते. सुदैवाने या अपघातातून सर्वजण सुखरूप बचावले. कुळे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.