बनावट व्हिसाप्रकरणी तिघांची परत पाठवणी

0
97

बनावट व्हिसाप्रकरणी दोहा – कतार येथे तिघा भारतीयांना अटक करण्यात आली. काल दाबोळीहून कतार एअरवेजच्या विमानातून निघालेले लखविंदर सिंग (२२), लवप्रीत सिंग (१९) व सोमल बलजीत सिंग (३३) हे दोहा येथे उतरल्यानंतर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी तपासणी केली असता त्यांचे व्हिसा बनावट असल्याचे आढळले. त्यांना तेथे ताब्यात घेण्यात आले व परत पाठवणी करून दाबोळीस रवाना करण्यात आले. दाबोळी विमानतळावरील इमिग्रेशन अधिकार्‍यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. दोहा कतार येथून ते कॅनडाला जायच्या तयारीत असताना इमिग्रेशन अधिकार्‍यांच्या लक्षात सदर बनावट व्हिसाचा प्रकार आला. दाबोळी विमानतळावर कडक सुरक्षा असताना बनावट व्हिसाच्या आधारे हे कसे निसटू शकले असा प्रश्न निर्माण झाला आहे.