बनावट नोटांप्रकरणी संशयितास मध्यप्रदेशात अटक

0
283

पणजी पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणातील मुख्य संशयित नारायण सिंह याला मध्यप्रदेशमध्ये अटक करून गोव्यात आणले आहे.
पणजी पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणी पंजाबामधील पाच जणांना अटक केली आहे. या टोळीने कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्य करून पणजी, पर्वरी या भागात बनावट नोटा चलनात आणलेल्या होत्या. पणजी पोलिसांनी कारवाई करून तीन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केलेल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या बनावट नोटांमध्ये ५०० रुपये, २०० रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. पणजी पोलिसांचे एक पथक या बनावट नोटांच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर भारतात गेले होते.
या प्रकरणातील मुख्य संशयित नारायण सिंग याला मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात पणजी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. संशयित नारायण सिंग याला दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.