बनावट दाखल्यांद्वारा मालमत्ता विक्री प्रकरणी एकास अटक

0
100

विदेशात स्थायिक झालेल्या जुझे आवितो पिंटो यांचे २००२ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या नावावरील सुकूर येथील मालमत्ता बोगस दाखले करून जुझे आवितो पिंटो यांनीच विकल्याचे भासविण्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने संशयित आरोपी इस्तेव्हन एलविस डिसोझा याला पोलिसांनी बांबोळी येथे अटक केली. या प्रकरणातील अन्य आरोपी फरारी आहेत. वरील प्रकरणी मालमत्तेच्या मालकाची पुतणी ओतिला मास्कारेन्हस यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी एका सरकारी अधिकार्‍याचीही चौकशी होऊ शकते, असे संकेत अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिले.