बगदादमधील बॉम्ब स्फोटांत १३० ठार

0
93

>> ‘इसिस’ने स्वीकारली जबाबदारी

 

दहशतवाद्यांच्या क्रौर्याचे थैमान चालूच असून बांगला देशात शनिवारी दिवसा झालेल्या हल्ल्यापाठोपाठ त्याच दिवशी मध्यरात्री ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने त्याहून अमानुषपणे दोन कार बॉम्ब स्फोट घडवून १३० जणांचा बळी घेतला. याचबरोबर या हल्ल्यात २०० हून अधिक जण जखमी झाल्याने बळींची संख्या वाढण्याची भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली असल्याचेही वृत्त आहे.
रमजानचा उपवास सोडल्यानंतर रात्री लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारात आले होते. यावेळी पहिला स्फोट कराज या बाजारपेठेत ट्रकमध्ये घडवून आणण्यात आला. कराडा हे बाजारपेठेचे ठिकाण नेहमीच वर्दळीचे असते. रमजान असल्यामुळे तेथे अधिक गर्दी उसळली होती. अशा वेळी अचानक झालेल्या स्फोटामुळे या भागात हाहा:कार माजला, अनेक ठिकाणी आगही लागली.
दुसरा बॉम्बस्फोट अल शाब शहरात झाला. दोन्ही स्फोटांमध्ये मिळून १३० जण ठार, तर २००हून अधिकजण जखमी झाले.