इराकची राजधानी बगदाद येथे काल गुरूवारी झालेल्या दोन आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात २८ जण ठार तर ७३ जण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बगदादमधील टायेरान स्क्वेअरमधील कपड्यांच्या बाजारात हा हल्ला झाला. यावेळी एक हल्लेखोर आजारी असल्याचे कारण देत बाजारात घुसला. त्याच्याजवळ गर्दी वाढल्यानंतर त्याने स्फोट घडवून आणला. तर, या हल्ल्यानंतर मृतदेह व जखमींच्या शेजारी नागरिक जमले असतानाच दुसरा आत्मघाती हल्ला झाल्याची माहिती इराकच्या गृहमंत्रालयाने दिली.
सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसर रिकामी केला. गुरुवारी झालेला हा हल्ला इराकमध्ये वर्ष २०१८ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा भीषण हल्ला आहे.