बंगालच्या उपसागरातील मंडस चक्रीवादळामुळे गोव्यातील हवामानात बदलाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील काही भागात ९ ते १२ डिसेंबर पर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरातील मंडस चक्रीवादळ ९ डिसेंबरच्या रात्रीच्या सुमारास उत्तर तामिळनाडू – पुद्दुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश किनार्याला पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा दरम्यान ओलांडून पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या चक्रीवादळाचा गोव्यावर मोठा परिणाम होणार नाही. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.