राहुल गांधी यांच्यावर टीका व बदनामी प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याविरोधात गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पणजी पोलीस स्थानकात गोवा प्रदेश काँग्रेस समितीकडून काल रितसर तक्रार दाखल केली. सदानंद शेट तानावडे यांनी एका पत्रकार परिषदेत ‘स्त्री शक्ती’ या विषयावरून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी शिवतीर्थावर केलेले भाषण जगजाहीर आहे. त्यांनी आपल्या भाषणात स्त्री शक्तीचा कुठेही उल्लेख केलेला नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.