बँक खाती गोठवली; काँग्रेस न्यायालयात

0
15

आयकर विभागाकडून त्यांची बँक खाती गोठवण्याविरोधात काँग्रेस पक्षाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी अर्धा तास आधी मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात 49 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत तिन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचा मुद्दा उपस्थित केला. तिघांनीही आमची खाती गोठवून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीची चर्चा कशी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीपूर्वी पक्षाची बँक खाती गोठवून काँग्रेसला पंगू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. आम्ही कोणतेही काम करू शकत नसलो तर लोकशाही कशी टिकणार? असा सवाल सोनिया गांधींनी केला.