दाबोळी विमानतळ ते वेर्णा फ्लायओव्हरसाठी ५५० कोटी रुपयांची निविदा पुढील तीन महिन्यांत काढण्यात येणार असल्याचे काल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. या फ्लाओव्हरखाली सात ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावे लागणार आहेत. त्यामुळे या फ्लायओव्हरच्या खर्चात वाढ झाली आहे. हे भुयारी मार्ग लोकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.