‘फ्रिगेट’चे सक्षमीकरण

0
138

– अनंत जोशी

अशा ङ्ग्रिगेटची बांधणी अशी केली होती की सर्व तोङ्गांचे वजन हे समप्रमाणात जहाजाच्या कण्यावर विभागले जायचे. जोशुआ नावाच्या अभियंत्याने असे ठरविले की फक्त अमेरिकेत वाढणारे व मूबलक प्रमाणात मिळणारे ‘ओक’ या झाडाचे लाकूड जहाज बांधणीसाठी वापरावे. त्याप्रमाणे खरोखरच हे लाकूड वैशिष्टपूर्ण ठरले.

 

१६५० मध्ये ब्रिटिश नौसेनेने ज्या अनेक युद्धनौका बांधल्या त्या सर्व नौकांना ‘ङ्ग्रिगेट’ असं संबोधलं जायचं. त्यात दोन माळ्यांच्या जहाजांचा सहभाग असायचा. अशी जहाजे ६० च्या जवळपास तोङ्गा, आकाराने मोठ्या, तसेच सर्व तर्‍हेने सक्षम होत्या. त्यावेळेच्या मानाने त्या सर्वसंपन्न होत्या. पण त्या वेळेस अशा नौका ‘क्रुझर’ म्हणूनही वापरात होत्या.
आतापर्यंत जहाजाच्या बांधणीत बर्‍याच सुधारणा होत गेल्या. १६७६ साली ‘चार्लस गल्लेय’ या जहाजाच्या एका माळ्यावर वल्हविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली, ज्यात एकाच वेळी चाळीसजण वल्हवू शकत होते. त्याचं मुख्य कारण म्हणजे, ज्या वेळेस मंद वारा असेल त्यावेळेस वेग वाढविण्यासाठी वल्हांचा वापर करता येत होता. यावर ३२ तोङ्गा बसविल्या जायच्या.
अभिनव आराखडा
१८ व्या शतकाच्या मध्यास अभिनव अशा जहाजांची निर्मिती झाली, ज्यांची पारख नेपोलियनच्या युद्धात ङ्ग्रेंचाकडून दिसून आली. १७४० मध्ये ङ्ग्रेंचांनी ‘मेडी’ हे जहाज बांधले. ते एक आदर्श असे होते. ही जहाजे चौकोनी शिडाची तसेच सर्व तोङ्गा एका वरच्या मजल्यावर बसविलेल्या असायच्या. आतापर्यंत ज्या खालच्या मजल्याला तोङ्ग मजला असे संबोधिले जायचे, पण आता या मजल्यावर काहीही दारुगोळा नसायचा. आता या ठिकाणी खलाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच ही पाण्याच्या पातळीच्या खाली स्थित असते.
१७७७ ते १७९० च्या दरम्यान ङ्ग्रेंचांनी एकूण ५९ शिडांच्या जहाजांची निर्मिती केली, ज्यांची लांबी १३५ फूट असून त्यांची खोली १३ फूट होती. तसेच त्यांचा वेग २६ कि.मी. प्रती तास असा नोंदण्यात आला होता. या सर्व नौकांचा वेग शत्रुपक्षाच्या जहाजांपेक्षा अधिक होता. तसेच त्या आपल्या पूर्ण तोङ्गांनिशी लढण्यास सक्षम होत्या. दोन मजल्याच्या जहाजांपेक्षा या सक्षम होत्या.
१७४०-१७४८ च्या ऑस्ट्रियन युद्धादरम्यान शाही ब्रिटिश नौसेनेने ङ्ग्रेंच नौसेनेच्या अशा काही नौका काबीज केल्या होत्या, त्यांचा प्रभाव ब्रिटिशांवर पडला. याचे मुख्य कारण त्यांची बंदरात हाताळण्याची क्षमता. ब्रिटिश नौसेनेने लवकरच याच धर्तीवर आपल्या सोयीनुसार त्यात बदल करून नव्या नौका बांधल्या. या सर्व नौका एक मानक म्हणून मानण्यात आल्या. त्या सामरिक महत्त्वाच्या ठरल्या. या ब्रिटिश ङ्ग्रिगेटवर २८ तोङ्गा वाहून नेण्याची क्षमता होती. यात वेळेनुसार सुधारणा होत यांची संख्या ३६ पर्यंत वाढविण्यात आली. त्याशिवाय लहान तोङ्गांचा भरमार होता.
ब्रिटिश तसेच अमेरिकेच्या ङ्ग्रिगेट युद्धनौकांवर भर म्हणून लहान तोङ्गा जहाजाच्या पुढील व मागील मोकळ्या जागेत बसविल्या होत्या. त्याशिवाय ब्रिजच्या बाजूलासुद्धा बसविल्या जायच्या. त्यामुळे मारक क्षमता वाढली गेली. १८ व्या शतकाच्या शेवटी शाही नौसेना ज्या ङ्ग्रिगेट वापरत होती त्या जवळपास ९०० टन वजनी होत्या. तसेच त्या ३६ तोङ्गांनी सज्ज होत्या. याच्या यशस्वीरीत्या वापरानंतर १००० टन वजनाच्या नौका बांधण्यात आल्या, तसेच ३८ तोङ्गा बसविण्यात आल्या.
विशालकाय ङ्ग्रिगेट अमेरिका नौसेनेचे ‘कोंस्टीटूशन’
१७९७ मध्ये अमेरिकन नौसेनेच्या सहापैकी तीन उत्कृष्ट ङ्ग्रिगेट ४४ नौका होत्या. त्यांवर ५६ ते ६०, २४ पौंडाच्या तोङ्गा वाहून नेत असत. या युद्धनौका सर्व दृष्टीने युध्दासाठी परिपूर्ण होत्या. सर्व अस्त्रशस्त्रांनी सज्ज होत्या. बाकी ज्या मोठ्या नौका होत्या त्यांच्याबरोबर त्यांची तुलना केली जायची. १८१२ च्या युद्धात बर्‍याच अशा जहाजांना क्षती पोचली. त्यानंतर अशी सूचना देण्यात आली की ज्यावर ३८ तोङ्गा किंवा त्याहून कमी असतील त्यांनी अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला करू नये. सध्या ‘कोंस्टीटूशन’ हे जहाज संग्रहालय म्हणून जतन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात जुने, शीड असलेले जहाज अशी त्याची मान्यता आहे. त्याचबरोबरची आणखीन दोन जहाजे म्हणजे प्रेसिडेंट व युनायटेड स्टेट याही अमेरिकेच्या दिमतीला होत्या.
अशा ङ्ग्रिगेटची बांधणी अशी केली होती की सर्व तोङ्गांचे वजन हे समप्रमाणात जहाजाच्या कण्यावर विभागले जायचे. जोशुआ नावाच्या अभियंत्याने असे ठरविले की ङ्गक्त अमेरिकेत वाढणारे व मूबलक प्रमाणात मिळणारे ‘ओक’ या झाडाचे लाकूड जहाज बांधणीसाठी वापरावे. त्याप्रमाणे खरोखरच हे लाकूड वैशिष्टपूर्ण ठरले.