फोंड्यात काँग्रेसचा विजयोत्सव

0
11

दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा विजय झाल्यामुळे फोंडा काँग्रेस गट समितीतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे राजेश वेरेकर, फोंडा काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष विल्यम आगीयार, अरुण गुडेकर, शब्बीर मुल्ला, फ्रान्सिस फर्नांडिस, माजी सरपंच सांतान फर्नांडिस, नारायण नाईक व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राजेश वेरेकर यांनी, दक्षिण गोव्यात काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय झाला असून आमदारांनी पक्षांतर केले तरी त्याचा परिणाम काँग्रेसवर झालेला दिसून येत नाही. यावरून लोकांनी पक्षांतर करणाऱ्याना नाकारले असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. विजयी झालेले विरियातो फर्नांडिस हे निश्चित लोकांचे प्रश्न सोडविणार आहे. कारण गोव्याचे आवाज असलेले विरियातो फर्नांडिस आता भारताचा आवाज बनला असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. भाजपने सरकारी यंत्रणा तसेच सत्तेचा वापर करून दक्षिण गोव्यात विजय मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पण लोकांच्या विश्वासावर विरियातो फर्नांडिस यांनी विजय प्राप्त केला आहे. फोंडा परिसराच्या समस्या सोडविण्यासाठी नवीन खासदार निश्चित तालुक्यात प्रत्येक 3 महिन्यांनी भेट देणार असल्याचे राजेश वेरेकर यांनी सांगितले.