फोंडा, साखळी पालिकेची निवडणूक मे महिन्यात होणार

0
12

राज्यातील फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिकांची निवडणूक येत्या मे 2023 मध्ये घेतली जाणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
साखळी नगरपालिका निवडणूक मुख्य अधिकारी म्हणून उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि फोंडा नगरपालिका निवडणूक मुख्य अधिकारी म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी – फोंडा आणि साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मामलेदार-फोंडा यांची नियुक्ती केली आहे. साखळी पालिका निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी डिचोली आणि साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून डिचोली मामलेदार यांची नियुक्ती केली आहे.