फोंडा शहरातील रस्ते ओस भाजीपाला मार्केटात शांतता

0
159
फोंडा मार्केट परिसर असा शांत होता.

फोंडा, ( प्रतिनिधी) ः कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये व त्यावर नियंञण यावे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जनतेला कर्फ्यू काळात सरकारला सहकार्य करण्यासाठी दिलेल्या हाकेला फोंडा शहर व ग्रामीण भागात आज (बुधवारी) चांगला प्रतिसाद लाभला.
फोंड्यातील मुख्य रस्ते ओस पडले होते. तर शहरातील मुख्य मार्केट कॉम्प्लेक्समध्ये शांतता पसरली होती. काही नागरिक शहरातील एखाद दुसऱ्या दुकानांवर जीवनावश्यक वस्तू मिळवताना दमछाक करताना दिसत होते. काही लोकांनी गरजेपेक्षा अधिक जीवनावश्यक वस्तूंचा साठा केल्यामुळे गरजूंना अन्नधान्य खरेदी करताना धडपड करावी लागत असल्याबद्दल काही जणांकडून खंत व्यक्त करण्यात येत होती.