फोंडा नगरपालिका मंडळात बोगस कामगारांची नोंदणी दाखवून रोखपाल पैसे खात असल्याची रीतसर तक्रार कोणी नोंदवित असेल तर या प्रकरणाची चौकशी करण्यास आपण तयार असल्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल विधानसभेत आमदार लवू मामलेदार यांच्या प्रश्नावर सांगितले.
या महामंडळात ३८० कामगार असुन पैकी २१५ फोंडा भागातील आहेत. त्यांची नांवेही तेथे नसल्याचे मामलेदार यांनी सांगितले. कामगार म्हणून नोंदणी करून घेण्यासाठी प्रत्येक कामगाराचे बोटांचे ठसे घेण्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये दिल्याची माहिती असल्याचे मामलेदार यांनी सांगितले.
तसे असेल तर आपण नगर विकास खात्याच्या संचालकांना चौकशीचा आदेश देत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचेही ते म्हणाले.