फेरीसेवेमुळे झालेली वाहतूक कोंडी सोडवणार : फळदेसाई

0
2

रायबंदर-चोडण जलमार्गावर दोन रो-रो फेरीबोट सेवा सुरू केल्यानंतर रायबंदर तसेच चोडणच्या दिशेने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागण्याची जी घटना घडली. त्याविषयी काळजी करण्याची गरज नसल्याचे नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. या रो-रो फेरीबोट सेवेमुळे धक्क्यांवर दुचाकींची गर्दी झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण व त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याचे तसेच अतिरिक्त जुन्या फेरीबोटीही या जलमार्गावर घालण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.