- डॉ. प्रदीप महाजन
इंटरस्टिशियल फुप्फुसाच्या आजाराला लंग फायब्रोसिस असंही म्हणतात. या आजारात फुप्फुसांमध्ये चट्टे असतात. हवेची देवाणघेवाण करता येत नसल्याने फुप्फुसांच्या ऊतींना ताठरपणा येतो. यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास अडचण जाणवू लागते.
‘इंटरस्टिशियल फुफ्फुसा’च्या आजारावर आता स्टेम सेल थेरपी अतिशय फायदेशीर ठरू लागली आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. एका २० वर्षीय तरुणीची तब्बल सहा वर्षानंतर केवळ स्टेम सेल थेरपी उपचारपद्धतीमुळे फुप्फुसाच्या या आजारातून कायमस्वरूपी सुटका झाली आहे.
ही तरुणी १४ वर्षांची असल्यापासून तिला श्वास घेताना अडचण जाणवत होती. स्पष्ट बोलताही येत नव्हते. मुलीला नेमका काय त्रास होतोय हे न कळल्याने उपचार करण्यास विलंब झाला होता. या तरुणीला वारंवार उलट्या आणि पोटाच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना जाणवत होत्या. मुलीची बिघडती प्रकृती पाहता कुटुंबीयांनी तिला तातडीने डॉक्टरांकडे नेले. याठिकाणी वैद्यकीय चाचणी अहवालात तिला फुफ्फुसाच्या गंभीर आजार असल्याचे निदान झाले.
लहानपणापासून या तरुणीच्या लहान सांध्यात वेदना आणि पहाटेच्या वेळी पाठीत कडकपणा येणं अशी दैनंदिन समस्या जाणवत होती. थंडीच्या दिवसात तिला अधिकच त्रास व्हायचा. गुडघ्यांनाही सूज येत होती. कुटुंबीयांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवले तेव्हा तिला हृमॅटॉइड संधिवात असल्याचे निदान झाले. इतकंच नाहीतर फुप्फुसही दिवसेंदिवस कमकुवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
इंटरस्टिशियल फुप्फुसाच्या आजाराला लंग फायब्रोसिस असंही म्हणतात. या आजारात फुप्फुसांमध्ये चट्टे असतात. हवेची देवाणघेवाण करता येत नसल्याने फुप्फुसांच्या ऊतींना ताठरपणा येतो. यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास अडचण जाणवू लागते.
या मुलीला रात्री झोपेत श्वास कोंडण्याचा त्रास होत होतो. चालताना अचानक धाप लागायची. हे पाहून कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे दाखल केले. याठिकाणी तिला स्टिरॉइड दिले जात होते. परंतु प्रकृती सुधारत नसल्याने पालकांनी मुलीवर स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. या उपचारपद्धतीबद्दल कुटुंबीयांनी सोशल मिडियाद्वारे माहिती घेऊन संपर्क साधला. त्यानुसार या मुलीची सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर तिच्यावर थेरपी सुरू करण्यात आले.
फुफ्फुसात निर्माण झालेले चट्टे कमी करणे हा आयएलडी स्टेम सेल थेरपीचा मुख्य उद्देश आहे. या थेरपीद्वारे फुप्फुसाच्या ऊतींचे संपूर्ण आरोग्य सुधारते. यामुळे रुग्णाला श्वास घेताना कोणतीही अडचण जाणवत नाही. फुप्फुसाची क्षमता सुधारण्यासाठी तिला फिजिओथेरपी आणि श्वसनाचा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या थेरपीमुळे सांध्यातील वेदना आणि ताठरपणा कमी होण्यास मदत मिळते.