काश्मीरमधील फुटीरतावादी व जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए न्यायालयाने काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० लाख रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला आहे.
आर्थिक दंड न भरल्यास त्याच्या शिक्षेत वाढ होणार आहे. एनआयएने न्यायालयाकडे यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या या निकालानंतर यासिन मलिकची रवानगी दिल्लीतील तिहार जेलमध्ये होणार आहे.