फिलिप नेरी फेर्रांव यांची मोठी घोषणा

0
16

सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांचे दर्शन 21 नोव्हेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित केले जाणार आहे, अशी घोषणा कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियरच्या वार्षिक फेस्त उत्सवात बोलताना काल केली. जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियरचा वार्षिक फेस्त उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अन्य आमदार व भाविकांनी या फेस्त उत्सवाला उपस्थिती लावली. कर्नाटक, महाराष्ट्र या शेजारी राज्यातील भाविकांनी सुध्दा उत्सवात सहभाग घेतला.