‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा २०१८

0
232

– प्रा. रामदास केळकर

१४ जूनला रशियात सुरू झालेल्या या ‘फिफा’ विश्‍वचषक फुटबॉल महासंग्रामात ३२ संघांचे खेळाडू ६४ सामन्यांतून आपले कौशल्य करोडो प्रेक्षकांना घडविणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सगळ्या जगाला खिळवून ठेवणारी ही स्पर्धा आहे. १४ जून रोजी सुरू झालेली ही स्पर्धा १५ जुलैपर्यंत चालेल.

क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्ही खेळ लोकप्रियतेच्या बाबतीत आघाडीवर असले तरी फुटबॉल हा जास्तीत जास्त देशांदरम्यान खेळला जाणारा खेळ आहे या अर्थाने तो अधिक लोकप्रिय आहे असे मानायला हरकत नाही. टीव्हीमुळे तर या लोकप्रियतेत अधिकच भर पडत आहे. इंग्लिश प्रीमियर लीग, स्पेनिश लीग, युरोपियन चॅम्पियन्स लीग आदी स्पर्धांचे थेट प्रक्षेपण घरबसल्या प्रेक्षक पाहत असतात. यामध्ये युवा प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. १४ जूनला रशियात सुरू झालेल्या या ‘फिफा’ विश्‍वचषक फुटबॉल महासंग्रामात ३२ संघांचे खेळाडू ६४ सामन्यांतून आपले कौशल्य करोडो प्रेक्षकांना घडविणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सगळ्या जगाला खिळवून ठेवणारी ही स्पर्धा आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
या स्पर्धेचा माहोल यजमान रशियाबरोबर इतर देशांतही हळूहळू वाढू लागला आहे. वृत्तपत्रे, मासिके ३२ संघांतील विविध स्टार खेळाडूंचे फोटो, आकडेवारी, स्पर्धेची माहिती देण्यासाठी आपली गुळगुळीत रंगीत पाने खर्च करीत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने टी-शर्ट, लोगो, बोधचिन्हे, बूट, झेंडे आदी साहित्य बाजारपेठेचे आकर्षण बनू लागली आहेत. ‘झाबिवाका’ नावाचा लांडगा या स्पर्धेचे ‘मॅस्कॉट’ असून ‘लिव्ह इट अप’ हे या स्पर्धेचे अधिकृत गाणे आहे.
भारताचा या स्पर्धेत सहभाग नसला तरी इथले प्रेक्षक आपल्या रंगीत टीव्ही वाहिन्यांवरून फॉक्स स्पोर्ट्‌सच्या सौजन्याने घरबसल्या किंवा हॉटेल्समध्ये विजांच्या कडकडाटात आणि मुसळधार पावसाच्या धुंद वातावरणात या स्पर्धेतील सामन्यांचा आनंद लुटणार आहेत.
एकूण ३२ संघांची विभागणी आठ गटांमधून केली गेली आहे. यजमान रशिया आणि सौदी अरेबियादरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यजमान संघ पात्र संघांच्या मानांकनाच्या यादीत सर्वात तळाला असल्याने रशिया हा काही विजेतेपदाचा दावेदार नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. गतविजेत्या जर्मनीसह पोर्तुगाल (या संघाचे पाठीराखे गोव्यात जास्त प्रमाणात आहेत), ब्राझिल,
फ्रान्स, स्पेन, अर्जेटिना यांची नावे जग्जेतेपदासाठी घेतली जात आहेत. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला इराणचा संघ आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार? किती गोलने सामना जिंकला जाईल? यावर जोरदार सट्टा खेळला जाणार असे भाकित आहे. गोवाही त्याला अपवाद नसेल. फुटबॉलचे प्रेम किती आंधळे असू शकते त्याचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. अमेरिकेत १९९४ च्या स्पर्धेत यजमान अमेरिकेने कोलम्बियाला २-१ असे हरविले होते आणि त्याबरोबर कोलंबियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्यात आंद्रेसने प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेला चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात चेंडू गोलरक्षकाकडे मारला, पण त्याचा तो फटका इतका जोरदार होता की तो सरळ जाळ्यामध्ये गेल्याने स्वयंगोल झाला. त्याचे परिवर्तन पराभवात झाले. सामना होताच आंद्रस नातेवाइकांकडे जाणार होता तो बेत त्याने बदलला आणि तो मायदेशी रवाना झाला. मेंडेलिन येथे आपल्या मित्रांसमवेत हॉटेलमध्ये तो गेला असता तेथे तीन माथेफिरूंनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. याचे कारण होते आपल्या संघाचा झालेला पराभव!
सहभागी संघांचे गट व प्रतिस्पर्धी
१४ जून ते १५ जुलैपर्यंत ही स्पर्धा होईल. खालील गटांतील प्रत्येकी दोन संघ साखळी सामन्याच्या निकालांनंतर पुढच्या फेरीसाठी म्हणजे नॉक आउटला पात्र होतील.
१) गट ः रशिया, सौदी अरेबिया, इजिप्त, उरुग्वे.
२) गट ः पोर्तुगाल, स्पेन, मोरोक्को, इराण.
३) गट ः फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पेरू, डेन्मार्क.
४) गट ः आर्जेंटिना, आयसलँड, क्रोयेशिया, नायजेरिया.
५) गट ः ब्राझिल, स्वीत्झर्लंड, कोस्तारिका, सर्बिया.
६) गट ः जर्मनी, मॅक्सिको, स्विडन, द. कोरिया.
७) गट ः बेल्जियम, पनामा, ट्युनिशिया, इंग्लड.
८) गट ः पोलंड, सेनेगल, कोलंबिया, जपान.

विश्वचषकाचे प्रमुख दावेदार व त्यांची वैशिष्ट्ये
१) पोर्तुगाल जागतिक क्रमवारी ४, युरोपियन ‘ब’ गटाचे विजेता गेल्या स्पर्धेत साखळी फेरीतच गारद. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोची अखेरची स्पर्धा. प्रशिक्षक फर्नांडो सांतोस.
२) स्पेन जागतिक क्रमवारी ८, युरोपियन ‘ग’ गटात विजेते. २०१० च्या विश्वविजेत्या या संघाला गतस्पर्धेत साखळी फेरीतच बाहेर जावे लागले.
मागच्या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे १७१ गोल ३२ संघांनी नोंदले. त्यापूर्वी १९९८ च्या फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेत तेवढ्याच १७१ गोलांची नोंद झाली होती. यापूर्वी १९३० उरुग्वे आणि १९३४ इटली येथे झालेल्या स्पर्धेत ७० गोलांची नोंद ही या स्पर्धेच्या इतिहासातील कमी गोलांंची नोंद होय.
या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपदं (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२ अशी ५) ब्राझिलच्या नावे आहेत. त्या पाठोपाठ इटली आणि जर्मनी प्रत्येकी ४ वेळा जेते झाले आहेत. अन्य विजेत्यांत दोन वेळा उरुग्वे, अर्जेटिना, प्रत्येकी एक वेळा इंग्लंड, फ्रान्स, स्पेन यांचा समावेश आहे.

सर्वाधिक स्पर्धा खेळण्याचा मान (५ वेळा) मॅक्सिकोच्या आंतोनिओ याच्या नावे आहे.
फुटबॉल खेळात काहीवेळा एखादा खेळाडू आपल्या पराक्रमाने सामन्याचे चित्र बदलू शकतो. त्यातील एक म्हणजे अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सी. दिएगो मेरेडॉनानंतर अर्जेंटिनाला मिळालेला हा महान खेळाडू. त्याचा चपळ, चाणाक्ष खेळ सर्वांनाच भावतो आणि प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरायला लावतो हे सर्वानीच अनुभवले आहे. याच महिन्याच्या २४ तारखेला १९८७ साली जन्मलेला मेस्सी एका गरीब कुटुंबात जन्मला. ही स्पर्धा कदाचित त्याच्यासाठी अखेरची असू शकते. मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत लहानपणच्या दुखण्यातून त्याने स्वतःला सावरले व देशातर्फे खेळण्यापर्यंत झेप घेतली. गतवर्षी जर्मनीने त्याच्या संघाचा पराभव करून स्पर्धेतील दौड रोखली होती. यंदा आपल्या शेवटच्या संधीत निकराने खेळ करून काही चमत्कार घडावे, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांनी ठेवली तर त्यात नवल नाही!
इंग्लंडचा हॅरी केन जगातील सर्वोत्कृष्ट स्ट्रायकरपैकी एक आहे. त्याच्या कामगिरीवर इंग्लंडचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकेल अशी अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या या संघाने १९६६ नंतर स्पर्धा जिंकलेली नाही.

बेल्जियमचा संघ जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर आहे. हा संघ त्या गटात सर्वात मजबूत संघ मानला जातो. ईडन हजार्ड, केविन ब्रायनसारखे बलाढ्य खेळाडू संघात आहेत. अजूनही या स्पर्धेचे विजेतेपद त्यांना मिळाले नाही. बाद फेरीत धडकण्याची त्यांची क्षमता आपण नाकारू शकत नाही. १९९० च्या दशकात या संघाने फुटबॉलमधील सुवर्णकाळ अनुभवला पण गुणवत्ता असूनही या संघाला अपेक्षित यश मिळायला झुंजावे लागत आहे.
यजमान रशियाचा संघ मागच्या फिफा स्पर्धेसाठी पात्र ठरला होता व यंदा आयोजक म्हणून त्यांना स्पर्धेत आपसूकच संधी मिळाली. त्यांच्याकडून नवक्रांतीची अपेक्षा ठेवावी लागेल.
३२ संघ आणि त्यांचे ७३६ खेळाडू या स्पर्धेत उतरणार आहेत.
जर्मनीचा थॉमस मुलर रशियातील स्पर्धेत १० गोलांचा अनुभव घेऊन उतरेल.
इजिप्तचा गोलकिपर इसाम एल हदारी हा स्पर्धेतील वयाने सर्वात ज्येष्ठ खेळाडू असेल. तो ४५ वर्षं आणि ५ महिन्यांचा आहे.

विश्वचषकाचा पहिला सामना १३ जुलै १९३० ला झाला. त्याच दिवशी आणखी सामना खेळविण्यात आला तो फ्रान्स वि. मॅक्सिको तर दुसरा होता अमेरिका वि. बेल्जियम. पहिला सामना फ्रान्सने ४-१ असा जिंकला आणि या सामन्यात तसेच स्पर्धेचा पहिला गोल नोंदविण्याचा मान ल्युसियन लॉरेन्ट या फ्रान्सच्या खेळाडूने पटकाविला. १९४२ व १९४६ च्या स्पर्धा महायुद्धामुळे रद्द झाल्या.

ब्राझिलने या स्पर्धेत वर्चस्व गाजविताना प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळविली आहे.
सामन्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कडक नजर ठेवली जाते. पण १९८६ च्या स्पर्धेत इंग्लड विरुद्धच्या सामन्यात मेरेडॉनने चक्क हाताने चेंडूला स्पर्श करून गोलरक्षक शीलटोन याला चकवीत गोल केला. ट्युनिशियन पंच अली नासिर यांनी तो मान्यही केला!
आयर्लंडचा कर्णधार रॉय किनी वलयांकित खेळाडू. पण विचित्र स्वभाव असलेला हा खेळाडू २००२ स्पर्धेत सरावाच्या ठिकाणी असलेल्या व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करून चक्क मायदेशी परतला. हा संघ कर्णधाराच्या उपस्थितीत स्पर्धेतील सामने अपेक्षेपेक्षा चांगला खेळला!
हैती देशाचा बचाव रक्षक अर्नेस्ट जीनने १९७४ च्या स्पर्धेत उत्तेजक औषध सेवन केल्याचे सिद्ध झाले तेव्हा त्याला त्याच्याच देशाच्या संघटकांनी यथेच्छ चोप देऊन घरी पाठविले.
या स्पर्धेत २००६ साली फ्रान्सच्या झिनेदिन झिदान या अव्वल खेळाडूने इटलीच्या मार्कां मेटरझी याच्या छातीवर स्वतःचे डोके आपटले होते. खरेतर वाहिन्यांवर ही घटना चर्चिली जात राहिल्याने कोण चुकीचा वागला याबद्दल अनेकांना उत्सुकता होती अखेरीला झिदानने कारण सांगितले. झाले होते असे की मार्काने त्याची जर्सी मागितली होती. ती हवी असेल तर सामन्यानंतर भेट असे झिदानने सांगितले तेव्हा मार्काने ‘तुझ्यापेक्षा तुझ्या बहिणीचा जर्सी आवडेल’ असे उत्तर दिले. त्यावर चिडून झिदानने वरील कृती केली होती.
अशा या स्पर्धेला म्हणूनच ‘महासंग्राम’ असे म्हटले असावे. आपण या खेळाचा आनंद लुटताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कोण विजेतेपद मिळवेल यावर लक्ष केंद्रित करूया…