सीमेपाईण, मंगेशी-म्हार्दोळ येथे वन्य प्राण्यांच्या शिकाऱ्याच्या उद्देशाने लावलेल्या फाशात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. वनखात्याने मृत्युमूखी पडलेल्या बिबट्याचे शव ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. मंगेशी, कुंकळ्ये, म्हार्दोळ आदी परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. बिबट्याने वासरे, कुत्री यांच्यावर हल्ले केले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.