प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो सध्या अध्यक्षपद सोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे. सांताक्रूजचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांच्यावर कारवाई करण्यास पक्षश्रेष्ठींनी विलंब लावल्याने फालेरो नाराज झाल्याची चर्चा आहे. फालेरो यांनी अध्यक्षपद सोडल्यास ते पद गिरीश चोडणकर यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्ष स्वच्छ करण्याच्या हेतूने माजी खासदार जॉन फर्नांडिस याना अध्यक्ष केले होते. त्यांनी पक्ष स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र त्यांच्या कार्यशैलीमुळे ते वादग्रस्त ठरले होते. अखेर अध्यक्ष पदावरून त्यांची उचलबांगडी करून फालेरो यांना अध्यक्ष केले होते.
पक्षाच्या आमदारांचे आवश्यक ते सहकार्यही फालेरो यांना मिळत नाही. काही दिवसांपूर्वी फालेरो दिल्लीत गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार मोन्सेर्रात कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची पक्षांतून हकालपट्टी केल्यास ते असंलग्न आमदार म्हणून राहतील.