फातर्पा आंबेमळ येथे काल आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने फातर्प्यात रुग्णसंख्या २१ झाली आहे. एक परिचारिका पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्या कुटुंबातील लोकांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे फातर्पा सरपंच मंदा देसाई व केपेचे मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. दरम्यान, फातर्प्यातील तो भाग निर्बंधित क्षेत्र करण्याची तयारी चालू आहे.
दरम्यान, सासष्टी तालुक्यातील मडगावात १२, आंबेली २३, लोटली ११, नावेली २, फातर्पा २१ तसेच केपे येथे ६ रुग्ण आढळले आहेत.
फातर्पा येथे लॉकडाऊन असून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. तर चिंचोणे येथे गेल्या सात दिवसांपासून लॉकडाऊन असून ते ५ जुलैपर्यंत असेल. तेथील दुकाने सकाळी ४ तास खुली असतात. केळशी येथे ३ रुग्ण सापडल्याने तेथे ५० पेक्षा अधिक लोकांची तपासणी करण्यात आली.
मोतीडोंगरमध्ये नाकाबंदी
मोतीडोंगरमध्ये सर्व वाटा बंद करण्यात आल्या असून काही भाग कंटेनमेंट विभाग म्हणून घोषित केला आहे. पोलिसांनी तेथे नाकाबंदी केली असून तिथे आणखी २७ पोलिसांची नियुक्ती केली आहे.