फळभाज्यांतही रंगांचा वापर

0
100

मडगाव (न. प्र.)
परप्रांतातून आयात होत असलेल्या मासळीत फॉर्मेलिन असल्याचे दिसून आल्यानंतर गोमंतकीयांनी मासळी खाणे कमी केले. आता फळभाज्या, फळे व कडधान्यात ते रंग घालण्यात येत असल्याचे दिसून आले. आज सकाळी गांधी मार्केटात जावून ताजे हिरवे वाटाणे (ग्रीन पीस) घेतले व घरी जावून पाण्यात घातले असता सर्व पाणी हिरवेगार झाले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अमीत कंडुरी यांनी गांधी मार्केटात फळभाज्या विक्रेत्यांकडून ताजे हिरवे वाटाणे घेतले. या दिवसा नवरात्रोत्सव असल्याने भाज्या व ग्रीन पीसची मोठी खरेदी होते. घरी जावून धुण्यासाठी पाण्यात घातले असता क्षणार्धात पाणी हिरवेगार झाले. वाटाणे पाण्यात भीजत घालून व्यापार्‍याने सकाळी विक्रीस आणले होते. गांधी मार्केटात हे परप्रांतीय व्यापारी वाटाणे विकत ठेवतात व लोक विकत घेऊन जातात. पण आज ते अमीतच्या घरच्यांनी पाहून धक्काच बसला. अन्न व औषध प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या व्यापार्‍यांचे फावले आहे. अमीत याने तो फोटो घेऊन संबंधित खात्याला पाठविला आहे.