‘फलोत्पादन’च्या भाजी वाहनांची आमदारांकडून तपासणी

0
99

गोवा राज्य फलोत्पादन महामंडळातर्फे गोव्यातील नागरिकांना ताजी व चांगली तसेच स्वस्त भाजी पुरविण्यासाठी गोव्यात अनेक गाडे उघडण्यात आले आहेत. या सर्व गाड्यांवर भाजी पुरवठा करण्यासाठी येथे १२ व्यक्तींकडून भाजी घेतली जात आहे. या पुरवठा करणार्‍याकडून रोज ४० ट्रक भाजी गोव्यात आणली जात असते. भाजीचा पुरवठा करणारे चांगल्या प्रतीची व ताजी भाजी देतात की नाही याची खातरजमा करण्यासाठी फलोत्पादन महामंडळाचे चेअरमन तथा आमदार किरण कांदोळकर यांनी शुक्रवारी रात्री आपल्या बरोबर व्यवस्थापकीय संचालक नेल्सन फिग्रेदो व इतरांना सोबत घेऊन केरी येथील तपासणी नाक्यावर रात्रौ ११ वा. पासून पहाटे २.३० पर्यंत एकूण ३४ ट्रकांची तपासणी केली. मात्र यावेळी भाजी चांगली असल्याचे आढळून आले, असे कांदोळकर यांनी सांगितले.