फडणवीस यांच्या हस्ते आज भाजप कार्यालयाची पायाभरणी

0
5

कदंब पठारावर आज भाजप कार्यालय इमारतीसाठीच्या पायाभरणी समारंभाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे काही कारणास्तव येऊ शकणार नसून त्यामुळे ही पायाभरणी आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असल्याचे काल भाजप सूत्रानी सांगितले. हा कार्यक्रम आज संध्याकाळी होणार आहे.

भाजपच्या ह्या प्रदेश मुख्यालय इमारतीत एक 600 आसन क्षमतेचे सभागृह, प्रदेशाध्यक्ष तसेच इतरांसाठी केबिन्स, कॅन्टीन तसेच रात्रीच्या निवासासाठी खोल्या अशा सर्व सुविधा असतील.