गोव्यात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी ह्या येत्या १० डिसेंबर रोजी गोवा दौर्यावर येत आहेत. या दौर्याच्या वेळी दक्षिण गोव्यात त्यांची एक जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती काल कॉंग्रेस सूत्रांनी दिली.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा यापूर्वीच राज्यात एक दौरा झालेला असून या दौर्याच्या वेळी बांबोळी येथे त्यांची हजारो कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली होती. त्यापाठोपाठ आता प्रियांका गांधी यांची आता गोव्यात सभा होणार आहे.