प्राणी संग्रहालयाच्या अधिकार्‍यांना केंद्राचे सतर्कतेचे आदेश

0
165

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने न्यूयॉर्क येथील प्राणी संग्रहालयातील वाघाचे कोविड१९ निदान पॉझिटिव्ह आल्याने गोव्यासह राज्यांच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन यांना सतर्क राहण्याचा आदेश जारी केला आहे. देशातील प्राणी संग्रहालयातील अधिकार्‍यांनी वन्य प्राण्याच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याची गरज आहे. प्राण्यांच्या हालचालीवर चोवीस तास देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षा उपाय योजना हाती घ्यावी. आजारी असलेल्या प्राण्यांना क्वारंटाईन करून ठेवावे. आजारी प्राण्याच्या जास्त संपर्कात राहू नये, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.