>> सत्यपाल मलिक यांच्याकडून स्पष्ट
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोव्याचे मुख्यमंत्रंी डॉ. प्रमोद सावंत यांना लक्ष्य करण्याचा कोणताही इरादा नव्हता असे स्पष्टपणे सांगितले. गोवा सरकारला बदनाम करण्याचा आपण ठेका घेतलेला नाही असे सांगून आपण केलेल्या वक्तव्याचा आधार घेऊन सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हे चूक असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भ्रष्टाचारी आहेत असे आपण म्हटले नव्हते. गोवा सरकारला बदनाम करण्याचे कंत्राट आपण घेतलेले नाही, असा खुलासाही त्यानी काल केला.
पुढे बोलताना माझे गोव्यावर प्रेम आहे. गोवा सरकारही मला प्रिय आहे, असे मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
परवा एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतून मलीक यांनी गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर खळबळ मजली होती. तसेच सर्व विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.