प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष निवडीचे अधिकार अ. भा. अध्यक्षांना

0
98

>> प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे ठराव संमत

नव्यानेच निवडण्यात आलेल्या गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या काल झालेल्या पहिल्या बैठकीत गोवा प्रदेश अध्यक्ष व अखिल भारतीय कॉंग्रेस समिती सदस्य यांची नियुक्ती करण्याचे अधिकार अ. भा. कॉंग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला. सहाय्यक निर्वाचन अधिकारी पंकज पुनिया यांनी सदर ठराव मांडला. तर त्याला आमदार रवी नाईक यानी अनुमोदन दिले.

कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून राहूल गांधी यानी सूत्रे हाती घ्यावीत यासाठी त्यांना विनंती करण्याचा ठरावही संमत करण्यात आला. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी सदर ठराव मांडला. तर प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष एम्. के. शेख यांनी त्याला अनुमोदन दिले.

प्रदेश निर्वाचन अधिकारी व खासदार ध्रुवनारायण हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक निर्वाचन अधिकारी पंकज पुनिया, विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार लुईझिन फालेरो, आमदार प्रतापसिंह राणे, आमदार रवी नाईक आदी हजर होते.