राजधानी पटनात पर्यावरण रक्षण व वाहनांचा ताण कमी करण्यासाठी बिहार सरकारने ‘सायकल चलाव, पर्यावरण बचाव’ मोहीम हाती घेतली असून त्याचा आज शुभारंभ होत आहे. कमी अंतरासाठी सायकलला प्राधान्य देणे फ्रांस, हॉलंडसारख्या युरोपीय देशात लोकप्रिय ठरत असल्याचे पर्यावरण व वन मंत्री प्रशांत कुमार म्हणाले.