राज्यातील प्रत्येक सभागृहामध्ये साऊंड मॉनिटरिंग मीटर बसवणे आवश्यक आहे. नागरिकांनी येत्या १० जानेवारीपासून फक्त हीच सभागृहे बुक करावी, अशी सूचना पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी काल केली. नाताळ आणि नववर्षाच्या मध्यरात्री होणार्या प्रार्थनासभेला परवानगी घेण्याची गरज नाही.
न्यायालयाकडून ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जात आहे. येत्या १० जानेवारीनंतर साऊंड मॉनिटरिंग मीटरशिवाय नागरिकांनी कोणतेही सभागृह बुक करू नये. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक नोटीस जारी करून ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थितीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकासाठी परवानगी घेण्याची सूचना केलेली आहे, असेही काब्राल म्हणाले.