प्रज्ज्वल रेवण्णा याला 14 दिवसांची कोठडी

0
4

बलात्कार प्रकरणातील मुख्य संशयित आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला काल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच त्याची रवानगी 24 जूनपर्यंत बंगळुरू सेंट्रल तुरुंगात करण्यात आली आहे. कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणात रेवण्णावर बलात्काराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका प्रकरणात ही कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे इतर दोन प्रकरणात रेवण्णाने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, दोन्ही प्रकरणावरील सुनावणी अद्याप बाकी आहे.