देशाच्या प्रजासत्ताक दिनी खलिस्तानी आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी हल्ला घडवला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना माहिती दिली आहे. त्यामळे दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. दिल्ली पोलिसांकडून काही वॉण्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर देखील जागोजागी लावले आहेत. तसेच, संशयितांची शोधमोहीमदेखील सुरू करण्यात आली आहे. सध्या दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत, हल्ला होण्याची शक्यता आहे.