मेरशीचे पंच सदस्य प्रकाश नाईक अनैसर्गिक मृत्यू प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे काल सुपूर्द करण्यात आले.
प्रकाश नाईक यांचा १७ जानेवारी २०२० रोजी अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. प्रकाश याने मृत्यूपूर्वी आपल्या मोबाईलवरून वॉटस्ऍप ग्रुपवर पाठविलेल्या संदेशात दोघा व्यक्तींच्या सतावणुकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. प्रकाश यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर जुने गोवे पोलिसांनी विल्सन गुदिन्हो आणि ताहीर यांच्याविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
संशयित विल्सन गुदिन्हो पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांचे भाऊ आहेत. येथील जिल्हा न्यायालयाने विल्सन गुदिन्हो यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.