प्रकाशसिंग बादल पंचत्वात विलीन

0
7

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल काल पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर बादल या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सुखबीर बादल यांनी त्यांना मुखाग्नी दिला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, काल सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले होते.